तुकाराम बिजेनिमित्त देहूत वारकऱ्यांचा मेळा
मुंबई दि ५ : तुकाराम बीजे निमित्त राज्यभरातून वारकरी मोठ्या संख्येने देहूमध्ये दाखल झाले असून पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पहाटे मुख्य मंदिरामध्ये विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंदिरात भजनाचा कार्यक्रम झाला. भजनानंतर वैकुंठगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मुख्य पालखी पुढे मार्गस्थ झाली असून ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाले, त्या ठिकाणी कीर्तन सोहळा झाल्यानंतर फुले उधळण्यात आली.ML/ML/MS