अवकाशप्रेमीसाठी पर्वणी लवकरच दिसणार हा तेजस्वी धूमकेतू

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चमत्कारिक आकार आणि तेजाचा पिसारा मिरवणारा धूमकेतू पहायला मिळणे ही अत्यंत दुर्मिळ घटना असते. अवकाशप्रेमींसाठी लवकरच ही पर्वणी पहायला मिळणार आहे. tsuchinshan-atlas त्सुचिनशान-अॅटलस हा धूमकेतू 80 हजार वर्षांनी पृथ्वीच्या जवळ येत आहे. हा संपूर्ण जगभरातील लोक पाहू शकतात आणि याला पाहण्यासाठी कोणत्याही उपकरणांची देखील गरज भासणार नाही. हा Comet C/2023 A3 म्हणजेच Tsuchinshan-ATLAS या महिन्याच्या अखेरीस दिऊ शकतो. 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान हा दिसण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
. हा धूमकेतू आकाशात पूर्व-आग्नेय दिशेला हा धूमकेतू दिसेल. याला पाहण्यासाठी योग्य वेळ ही पहाते सूर्य उगवण्याच्या ठीक अर्धातास आधीची सांगण्यात आली आहे. जर तुम्ही 29 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरच्या सकाळी याला पाहण्याच्या प्रयत्न केला तर हा धूमकेतू दिसण्याची शक्यता जास्त आहे. हा सकाळच्या वेळी चंद्रकोरी प्रमाणे दिसेल. रात्रीच्या वेळी मात्र हा आकाशातील सर्वाधीक चमकदार तारा भासू शकतो.
SL/ML/SL
25 Sept 2024