साधी डाळ खाऊन कंटाळला? हे ट्राय करा
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वरण बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य
साहित्य :–
२ वाटी तुरीची डाळ.धुवून स्वच्छ
५ ते ६ पाकळ्या लसुण
१ चमचा जीरे
१ चमचा मोहरी
४ हिरवी मिरची
हिंग
६ कडिपत्ता ची पाने
हळद
कोथिंबीर
तेल
मीठ
वरण रेसिपीज कृती
तुरीची डाळ बनवताना प्रथम डाळ निवडून घ्यावेत.
मग स्वच्छ धुवून घ्यावेत.
नंतर धुतलेली डाळ कुकर मधे घाला.
१ग्लास पाणी घालून ३ ते ४ शिट्या येवू द्या.
जास्त पाणी घालू नका.
फोडणी देताना वरण खूप पातळ होईल.
४शिट्या झाल्यावर कुकर थंड होऊ द्या.
कुकर थंड झाल्यावर शिजलेली डाळ बाहेर काढून मोठ्या चमच्याने घोटून घ्या.
आता फोडणीची तयारी करून घ्या.
लसुण सोलुन घ्यावेत, मिरच्या चिरून घ्यावेत.टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत.
कोथिंबीर धुवून घ्यावेत आणी बारीक चिरून घ्यावेत.
नंतर गॅस वर एक पातेल ठेवा.पातेल गरम झाल्यावर तेल घाला.
तेल तापल्यावर १ चमचा जीरे घाला.नंतर मोहरी घाला.
जीरे आणी मोहरी तडतडल्यावर कडीपत्ता घाला.
नंतर लसुण ठेचून घालून.चिरलेली मिरची घाला.
त्यात हळद घाला.नंतर चिरलेला टोमॅटो घाला.
टोमॅटो शिजवल्यावर कुकर मधील शिजवून घेतलेली डाळ घाला.
मीठ चवीनुसार घालून एक चांगली उकळी येऊ द्या.
वरूण चिरलेली कोथिंबीर घाला.खाण्यास सर्व्ह करा.
खाण्यास तयार आहेत वरण.
ML/ML/PGB 10 Aug 2024