ट्र्म्प यांची भारताला पुन्हा धमकी, 25 टक्क्याहून अधिक वाढवणार टॅरिफ

नवी दिल्ली, दि. ५ : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापार तणावात मोठी वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. वॉशिंग्टन पुढील 24 तासांत भारतावरील आयात शुल्क (टॅरिफ) खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा इरादा बाळगून आहे, असे त्यांनी जाहीर केले. ट्रम्प यांनी दावा केला की, नवी दिल्लीने मॉस्कोसोबत रशियन तेल खरेदी करून सतत संबंध ठेवल्याने ही चिथावणी दिली जात आहे. याबद्दल त्यांनी यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती.
CNBC शी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, त्यांचे आयात शुल्क सर्वात जास्त आहे. आम्ही 25% वर एकमत झालो होतो. पण मला वाटते की मी पुढील 24 तासांत ते खूप वाढवणार आहे, कारण ते रशियन तेल विकत घेत आहेत. ते युद्धाच्या मशीनला इंधन देत आहेत. आम्ही भारतासोबत थोडा व्यापार करतो. ते आमच्यासोबत खूप व्यापार करतात.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या टिप्पणीपूर्वी त्यांनी भारतावर 25 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. ज्यात त्यांनी नवी दिल्लीवर मोठ्या प्रमाणात रशियन कच्चे तेल आयात करण्याचा आणि ते जागतिक बाजारपेठेत नफ्यासाठी पुन्हा विकण्याचा आरोप केला होता.
यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मेसेज पोस्ट केला होता. त्यात त्यांनी भारतावर मोठ्या प्रमाणात रशियन तेल विकत घेण्याचा आणि मोठ्या नफ्यासाठी खुल्या बाजारात ते पुन्हा विकण्याचा आरोप केला होता. त्यांनी लिहिले, युक्रेनमध्ये रशियन युद्धामुळे किती लोक मारले जात आहेत याची त्यांना पर्वा नाही. यामुळे मी भारताकडून अमेरिकेला मिळणारे आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे. याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, जे देश भारतावर टीका करत आहेत, ते स्वतः रशियासोबत व्यापार करत आहेत. युरोपियन युनियनने 2024 मध्ये रशियासोबत 67.5 अब्ज युरो ($78.02 अब्ज) चा व्यापार केला, तर अमेरिकेने युरेनियम हेक्साफ्लोराईड, पॅलेडियम, खते आणि रसायने आयात करणे सुरूच ठेवले आहे, याकडे भारताने लक्ष वेधले.
SL/ML/SL