कचऱ्याच्या ट्रकमधून सफाई कामगारांच्या वेशात ट्रम्प यांचा प्रचार
न्यूयॉर्क, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या आपल्या राज्यात विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे उमेदवार लक्ष वेधण्यासाठी काय काय कुरापती करतात हे आपण पाहत आहात. अशाच प्रकारे सध्या अमेरिकेत प्रचारांची रणधुमाळी माजली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोलाल्ड ट्रप्म नेहमी प्रमाणेच काहीतरी चमत्कारिक करून लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकत्यात झालेल्या प्रचार रॅलीमध्ये ते सफाई कामगाराचा वेश घालून कचरा नेणाऱ्या ट्रकमध्ये बसून आले होते.
अमेरिकेच्या निवडणुकीत बायडेन यांनी ट्रम्प समर्थकांना ‘कचरा’ म्हटल्यानंतर राजकारण तीव्र झाले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बुधवारी संध्याकाळी विस्कॉन्सिनमध्ये प्रचारासाठी गेले होते. येथे ते लाल टोपी आणि सफाई कामगाराचे जॅकेट घालून कचऱ्याच्या ट्रकमध्ये बसलेले दिसले. ट्रम्प यांनी ट्रकमध्ये बसून पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. ट्रम्प म्हणाले- कमला आणि जो बायडेन यांच्या वक्तव्याचा त्यांचा विरोध आहे. कमला आमच्या समर्थकांबद्दल काय विचार करतात ते बायडेन यांनी तंतोतंत सांगितले आहे, परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की अमेरिकेतील 250 दशलक्ष लोक कचरापेटी नाहीत. 29 ऑक्टोबर रोजी बायडेन यांनी ट्रम्प समर्थकांना ‘कचरा’ म्हटले होते. बायडेन यांनी ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या कॉमेडियनच्या टीकेला हे उत्तर दिले.
ट्रम्प यांनी 27 ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये रॅली आयोजित केली होती. यावेळी कॉमेडियन टोनी हिंचक्लिफ यांनी पोर्तो रिकोचे वर्णन ‘कचऱ्याचे बेट’ असे केले होते.
या विषयावर बायडेन म्हणाले होते – पोर्तो रिको समुदायाचे लोक अतिशय सभ्य आणि प्रेमळ आहेत. अमेरिकेच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. मला फक्त ट्रम्पचे समर्थक कचरा पसरवताना दिसतात.
हिस्पॅनिक वंशाचे लोक पोर्तो रिकोमध्ये राहतात. ते स्पॅनिश बोलतात. प्यू रिसर्च सर्वेक्षणानुसार, 2024 मध्ये 60% हिस्पॅनिक मतदार डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक आहेत. त्याच वेळी, रिपब्लिकन पक्षाला 34% हिस्पॅनिक मतदारांचा पाठिंबा मिळत आहे.पोर्तो रिको हे क्युबा आणि जमैकाच्या पूर्वेस अमेरिकेचे बेट आहे. 1898 मध्ये स्पेनने पोर्तो रिको अमेरिकेच्या ताब्यात दिले. या बेटावर 35 लाख लोक राहतात, पण सामोआ, गुआमसारख्या अमेरिकन राज्यांप्रमाणे पोर्तो रिकोच्या लोकांना निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाही
SL/ML/SL
31 Oct. 2024