ट्रम्प यांच्या धोरणांमुळे बाजार हादरला, पण परदेशी गुंतवणूकदारांच्या परतण्याच्या संभावनांमध्ये झाली वाढ

मुंबई, दि. 22 (जितेश सावंत) :
भारतीय बाजारात दोन आठवड्यांच्या वाढीला लगाम लागताना दिसला.ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांसंबंधी अनिश्चितता(ट्रेड वॉर),संमिश्र कॉर्पोरेट कमाई, एफआयआय विक्री आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यामुळे बाजाराने दोन महिन्यांतील सर्वात मोठी साप्ताहिक घट नोंदवली. आठवड्यातील प्रत्येक दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला.आठवडाभरात 400 हून अधिक समभाग दोन अंकी तोट्यासह बंद झाले.
The Indian market saw a halt to its two-week rally, recording its biggest weekly loss in two months due to uncertainty over Trump’s tariff policies (trade war), mixed corporate earnings, FII selling, and the rupee’s depreciation against the dollar. The market closed lower every day, with over 400 stocks ending in double-digit losses.
आठवडाभरात सेन्सेक्स 1921 अंकांनी म्हणजेच 2.46 टक्क्यांनी घसरला आणि 75939 पातळीवर बंद झाला . निफ्टीत 631 अंकांची म्हणजेच 2.67 टक्क्यांनी घसरण होऊन निफ्टीने 22929 या पातळीवर बंद दिला.
परदेशी गुंतवणूकदार (FII) काही काळापासून भारतीय शेअर बाजारात सातत्याने विक्री करत आहेत. या महिन्यात 13 फेब्रुवारीपर्यंत FII ने भारतीय शेअर बाजारात 24889 कोटी रुपयांची विक्री केली आहे. तर DII ने या महिन्यात 13 फेब्रुवारीपर्यंत 21655 कोटी रुपयांची खरेदी केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर परदेशी गुंतवणूकदार भारतात परततील,अशी अटकळ बांधली जात आहे.
Trump’s policies rattled the market, but the prospects of foreign investors making a comeback have surged.
या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रामुख्याने ट्रम्प टॅरिफ, रशिया-युक्रेन शांतता चर्चा, INR-USD दर, FII आउटफ्लो,यूएस FOMC (फेडरल ओपन मार्केट कमिटी) मीटिंग मिनिट्स याकडे राहील.
This week, investors’ focus will be on Trump’s tariffs, Russia-Ukraine peace talks, INR-USD exchange rate, FII outflows, and the US FOMC meeting minutes.
सध्या बाजार ओव्हरसोल्ड झोन मध्ये आहे आणि निफ्टी हळूहळू वरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल तथापि, प्रत्येक रॅलीवर विक्रीचा दबाव असेल. पण माझ्या मते, सध्या आपण असे म्हणू शकतो की निफ्टीने तळ तयार केला आहे
The market is currently oversold, and Nifty may gradually move upward. However, there will be selling pressure during each rally. In my opinion, we can say that Nifty has formed a bottom for now.
Technical Analysis of Nifty:
Closing on Friday: Nifty closed at 22929
KeySupportLevels:-22865,22798,22744,22681,22650-22642,22560-22450-22400-22300-22100-21900-21800- and 21,700 Breaking these could lead Nifty to further lower levels.
Resistance Levels: 22979.03,23092,23163,23276.33,23460.47 and23573.63. These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.
लेखक — शेअर बाजार,सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा तज्ज्ञ आहेत.
The author is an expert in stock market, cyber law, and data protection law.
ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant
ML/ML/PGB 16 Feb 2025