आंतरराष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत पुण्याच्या तृप्तीने जिंकले सुवर्णपदक

 आंतरराष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत पुण्याच्या तृप्तीने जिंकले सुवर्णपदक

पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील वारु गावातील कन्या तृप्ती शामराव निंबळे हिने नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण क्रीडा प्रकारातील तिच्या यशाबद्दल पंचक्रोशीतून तृप्ती आणि तिच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वडिल शाम निंबळे पुणे जिल्हात कुस्ती क्षेत्रातील मल्लसम्राट आहेत. तृप्तीमुळे संपूर्ण मावळचे आणि देशाचे नाव लौकिक वाढल्याची भावना तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केली.

यापूर्वी तृप्तीने विविध देशामध्ये जाऊन थायबाँक्सिंग स्पर्धांत सुवर्णपदके मिळवली आहेत. तिने 2018 कालावधीत पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवर, मध्य प्रदेशातील खांडवा येथे झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता.याबरोबरच भुतान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. आसाम येथील स्पर्धेत रजतपदक. गोवा राज्यात झालेल्या आंतराष्ट्रीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकाविले. आत्तापर्यंत तिने तब्बल 69 पदके मिळविले आहे.
नेपाळ येथून परतल्यानंतर तृप्तीचे गावात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. थायबॉक्सिंग क्रीडा प्रकारात तृप्तीने उंच भरारी घेतली आहे. तृप्तीला खेळाचे बाळकडू हे तिला घरातुनच मिळाले आहे.

थाई बॉक्सिंग म्हणजे काय?

मुए थाई, ज्याला कधीकधी थाई बॉक्सिंग म्हणून संबोधले जाते. हा थायलंडचा राष्ट्रीय खेळ आहे आणि सियामी (किंवा थाई) सैन्याच्या प्राचीन युद्धक्षेत्रातील डावपेचांमध्ये उगम असलेली मार्शल आर्ट आहे. 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात मय थाईची अनेक देशांमध्ये खेळली जाऊ लागले. हा एक लढाऊ खेळ आहे ज्यामध्ये स्टँड-अप स्ट्राइकिंग, स्वीप आणि विविध क्लिंचिंग तंत्रांचा वापर केला जातो. ही शिस्तबद्ध “आठ अंगांची कला” म्हणून ओळखली जाते कारण ती मुठी, कोपर, गुडघे आणि नडगी यांच्या एकत्रित वापराद्वारे वैशिष्ट्यपूर्ण वापर करत प्रतिस्पर्ध्यावर चढाई केली जाते

SL/KA/SL

5 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *