पुढील पाच वर्षांत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन्सची

 पुढील पाच वर्षांत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन्सची

मुंबई दि २६ : देशाच्या सकल स्थूल उत्पन्नामध्ये राज्याची हिस्सेदारी सातत्याने वाढत असून विकसित महाराष्ट्राचे डॉक्युमेंट हे केवळ पुस्तक न ठेवता येत्या चार ते पाच वर्षात आपली अर्थव्यवस्था एक लाख कोटींच्या घरामध्ये नेण्याचा आमचा उद्देश आहे, त्यासोबतच दरवर्षी दहा लाख रोजगार निर्मिती, परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे, वित्तीय तूट खाली आणणं आणि संसाधनांचे योग्य नियोजन करणे ही आमची यासाठीची उद्दिष्टे आहेत अशी अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडली. राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणा वरील आभार प्रदर्शक प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते .

आपल्या राज्याची अर्थव्यवस्था 2013 साली तेरा लाख कोटींची होती त्यात तिप्पट वाढ होऊन ती आता 51 लाख कोटींची आहे यामुळे पुढील चार ते पाच वर्षात दुष्काळ पडला नाही तर एक लाख कोटींची अर्थव्यवस्था करण्याचा उद्दिष्ट आपल्याला गाठता येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. दावोसच्या गुंतवणुकीसाठी योग्य असणाऱ्या वातावरणात आता महाराष्ट्राची ही मोठी चर्चा आहे, दावोस मध्ये करण्यात आलेल्या करारांचा अंमलबजावणी दर सातत्याने वाढत असून देशात देशाच्या एकूण गुंतवणुकीपैकी 39 टक्के गुंतवणूक आपल्या राज्याची आहे. आपलं राज्य देशात गुंतवणुकीबाबत पहिला क्रमांकावरती आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

राज्यातील बेरोजगारीचा दर 2022 साली चार टक्के होता तो आता 3.1% वरती खाली आला आहे. देशातील 20% नोंदणीकृत स्टार्टअप आपल्या राज्यात असून देशातील 119 पैकी 28 मोठे उद्योजक आपल्या राज्यातून या स्टार्टअप मधून तयार झाले आहेत अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली. नाशिक कुंभमेळ्याच्या निमित्ताने जगभरात आपलं ब्रॅण्डिंग करण्याचा आमचा प्रयत्न आहे, या ठिकाणी करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा जास्त प्रमाणात परतावा आपल्याला मिळतो आणि ही गुंतवणूक कायमस्वरूपी असून शाश्वत विकासासाठी ती केली जाते असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

आतापर्यंत शेतीमध्ये नुकसान झालेल्या विविध बाबींसाठी शेतकऱ्यांना 15,472 कोटी रुपये इतकी थेट रक्कम त्यांच्या खात्यामध्ये देण्यात आली आहे. कर्जमाफीचे आम्ही दिलेले आश्वासन उचित वेळी पूर्ण करू, मात्र मागच्या वेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती नको यासाठी त्यासाठी त्याचा अभ्यास करण्यात येत आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. मागणीनुसार 85% सौर कृषी पंपांच वाटप आजवर करण्यात आलं आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली .

नवीन शैक्षणिक धोरणानुसार तत्कालीन ठाकरे सरकारनेच पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता असं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भातील कागदपत्र सभागृहामध्ये दाखवली. मात्र आपल्या सरकारन केवळ मराठीची सक्ती केली असून इतर भाषा ऐच्छिक ठेवल्या आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले. देशाच्या इतिहासाची छेडछाड करून आजवर टिपू सुलतान चा गुणगान करण्यात आलं होतं, मात्र टिपू सुलतानाने लाखो हिंदूंची कत्तल केली हे कधी सांगितलंच गेलं नाही त्यामुळे टिपू सुलतान ची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची करणे हे आपल्याला कदापि मान्य होऊ शकत नाही असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले . पूर्वी काँग्रेस सरकारने एनसीईआरटीच्या पुस्तकात मोगलांना 18 पानं दिली होती तर शिवाजी महाराजांना केवळ एका परिच्छेदात स्थान दिलं होतं मात्र मोदी सरकारने आता महाराजांच्या इतिहासाला तब्बल वीस पानं दिली आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधी पक्ष संभ्रमित आणि भ्रमित दिसतो आहे त्यामुळे भ्रमात धावण्यापेक्षा संभ्रमातून बाहेर पडून राज्याच्या हितासाठी योग्य मुद्दे मांडावेत असा सल्ला देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिला.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *