बोरवली येथे तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई प्रतिनिधी, दि. १७ : शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आज संपूर्ण मुंबईत ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर शिवसेनेच्या वतीने देशभक्ती, एकता आणि अभिमानाचा जल्लोष करत भव्य तिरंगा यात्रा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी ९ वाजता कोरा केंद्र, बोरीवली पश्चिम येथून सुरू झालेल्या या रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. अंधेरी पश्चिम येथे या रॅलीची सांगता झाली.
ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है. आतंकवाद्यांना धडा शिकवल्याशिवाय केंद्र सरकार गप्प बसणार नाही. पाकिस्तान मुर्दाबाद हिंदुस्तान जिंदाबाद या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ऑपरेशन सेंटर नंतर आणखी देखील ठळक धडाकेबाज कारवाया होतील आणि पाकिस्तानला योग्य धडा शिकवला जाईल अशी माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल मात्र यांनी दिली. या रॅलीत खासदार रवींद्र वायकर जी, शिवसेना सचिव सिध्देश कदम जी तसेच पश्चिम उपनगरातील शिवसेना महिला -पुरुष विभागप्रमुख, मा. नगरसेवक- नगरसेविका आणि शिवसेना पदाधिकारी देखील उपस्थित होते .