लोकमान्य टिळक यांना विधान भवनात आदरांजली

 लोकमान्य टिळक यांना विधान भवनात आदरांजली

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आज महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधान भवनातील त्यांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) विलास आठवले, सह सचिव मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, अध्यक्ष यांचे सचिव सुनिल वाणी, उप सभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, उप सचिव राजेश तारवी, अवर सचिव विजय कोमटवार, मोहन काकड, सुरेश मोगल तसेच संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळयास गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

ML/KA/SL

1 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *