प्रख्यात वृत्तनिवेदक अनंत भावे यांना भावपूर्ण श्रद्धांजली: जाणून घ्या त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान

 प्रख्यात वृत्तनिवेदक अनंत भावे यांना भावपूर्ण श्रद्धांजली: जाणून घ्या त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान

पुणे, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दूरदर्शनचे प्रख्यात वृत्तनिवेदक आणि बालसाहित्यिक प्रा अनंत भावे (८८) यांचे काल रात्री पुणे येथे निधन झाले. प्रा. भावे यांनी ९० च्या दशकात दूरदर्शनवर सायंकाळच्या सत्रातील बातम्यांचे निवेदन केले. त्यांच्या निवेदन शैलीला एक खास ओळख होती. तब्बल २५ वर्षे त्यांनी हे काम केले. वृत्तनिवेदनासोबतच ते एक उत्कृष्ट बालसाहित्यिक म्हणूनही प्रसिद्ध होते. प्रा. भावे यांनी लहान मुलांसाठी ५० पुस्तके लिहिली, तसेच सुमारे ४०० कवितांची रचना केली. लहानांसाठी कथा आणि कविता सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. २०१३ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले.

अनंत भावे यांची पुस्तके

अग्गड हत्ती तग्गड बंब (बालवाङ्‌मय)
अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी (बालवाङ्‌मय)
A Flint Stone Becomes A Sparkling Star (बालवाङ्‌मय) (सहलेखिका माया पंडित)
अब्दुल गब्दुल (बालकविता)
अश्शी सुट्टी सुरेख बाई ! (बालकविता)
उथ्थाप्पाचे उंदीर (बालवाङ्‌मय)
एरिक लोमॅक्सचा दीर्घ प्रवास (बालवाङ्‌मय)
ॐ कासवाय नमः (बालवाङ्‌मय)
कासव चाले हळू हळू (बालकविता)
खंडोबा आणि खंडोबा : वाचा आणि रंगवा (बालवाङ्‌मय)
गरागरा गरागरा (बालकविता)
गारगोटी झाली आकाशचांदणी (बालकविता)
गिरकी घेऊन कबुतर सांगतंय (बालवाङ्‌मय)
घसरगुंडी पसरगुंडी (बालवाङ्‌मय)
चल रे भोपळो टुणुक टुणुक (बालवाङ्‌मय)
चला खाऊ पाणीपुरी (बालवाङ्‌मय)
चलो डोंगरगाव ! (बालवाङ्‌मय)
चिक्कीखाव् (बालकविता)
चिमणे चिमणे (बालकविता)
चिमी – चिमाजीची सर्कस (बालवाङ्‌मय)
चेंडूच्या फिरक्या (बालवाङ्‌मय)
झिमझिमपूरची झूम (बालवाङ्‌मय)
झिम झिम सरी (बालकविता)
जांभूळवनात सापशिडी (बालवाङ्‌मय)
जिराफ – झेब्रा – उंट – गेंडा – हिप्पो – हत्ती (बालकविता)
जोडाक्षरविरहित कविता : (खंडोबा आणि खंडोबा) वाचा आणि रंगवा
टंगळ-मंगळ (बालवाङ्‌मय)
टमू ठमू ढमू (कवितासंग्रह, बालवाङ्मय)
टिंबाराणी आणि इतर गोष्टी (बालवाङ्‌मय)
टेकाड्या (बालसाहित्य – नाटक)
डोंगरगावची चेटकीण (बालवाङ्‌मय)
तीन प्रवासी बारा पाय (बालवाङ्‌मय)
दुसरे महायुद्ध : काही कथा (बालवाङ्‌मय)
दोन चेहऱ्यांचा हेर रुडॉल्फ एबेल (बालवाङ्‌मय)
पटपटपूर पटपटपूर (विनोदी बालकवितासंग्रह)
‘बिस्मार्क’ ची शिकार (बालवाङ्‌मय)
मगरी मनातल्या (बालवाङ्‌मय)
माझी खार माझी खार (बालकविता)
मांजर – उंदीर – कुत्रे (कवितासंग्रह)
मॉंटीज डबल (व्यक्तिचित्रण)
मिठाईमॅड गुडबॉय (बालवाङ्‌मय)
मीच मान्या – मीच मेरी (क्युरी) (व्यक्तिचित्रण) (ऑडिओबुक)
युद्धकथा (कथासंग्रह)
लालमलाल (बालवाङ्‌मय)
सांगतात नेहरू चाचा वाचा : वाचा : वाचा (बालवाङ्‌मय)
सांगा सांगा ढगोजीबाप्पा ! (बालकविता)
हसो हसो (बालकविता)
उच्चकपाचक अंदाजपंचे
उंच उडी खोल बुडी

ML/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *