वाहतूक गड उद्घाटन सोहळा जल्लोषात

 वाहतूक गड उद्घाटन सोहळा जल्लोषात

मुंबई, दि.13
भाजपा ट्रान्सपोर्ट सेल प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटना यांच्या वतीने वाहतूक गड या नव्या मध्यवर्ती कार्यालयाचे भव्य उद्घाटन कुर्ला येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या सोहळात वाहन चालकांच्या न्यायासाठी आणि सरकारसोबत थेट संवादासाठी कार्यालय मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास भारतीय जनता पार्टी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक यांनी रिक्षा टॅक्सी स्टँड साठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडत वाहतूक गड हे सरकारपर्यंत वाहन चालकांचे प्रश्न पोहोचवणारे माध्यम ठरेल रस्ता सुरक्षा निधीमधून जास्तीत जास्त आरोग्य तपासणी व इतर उपक्रम राबवण्याचा विश्वास देखील त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला.
भाजपा नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वाहतूक गडाचे भविष्य आदर्शवत असल्याचे सांगितले हा गड गरिबांच्या न्यायासाठी काम करणारा किल्ला ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या कार्याध्यक्ष ईशा कोपीकर यांनी महिलांना वाहन क्षेत्रामध्ये नव्या रोजगाराच्या संधी कशा प्रकारे आहेत याचं प्रशिक्षण या कार्यालयाच्या माध्यमातून दिलं जाईल शासनाच्या विविध योजना महिलांकरता त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न वाहतूक गडच्या माध्यमातून सातत्यपूर्ण केला जाईल तसेच या उद्घाटन प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी माझ्या सरकारमध्ये वाहन चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सातत्यपूर्ण प्रयत्न करेन असा ठाम विश्वास व्यक्त केला. भविष्यकाळामध्ये या वाहतूक गडच्या माध्यमातून अनेक वाहन चालकांसाठी व्यसनमुक्ती अभियान व्यक्तिमत्व विकास रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यशाळा प्रवासी सेवा नम्रसेवा सर बचाओ घर बचाओ,मोफत हेल्मेट वाटप असे अनेक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. वाहतूकदार समाजाची प्रतिमा उंचावण्यासाठी हा गड परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरेल असे त्यांनी नमूद केले संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले वाहन चालक-मालक कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक यामुळे कार्यक्रमाची भव्यता अधिकच वाढली होती. गर्दीमुळे काही वेळ वाहतुकीस अडथळा झाल्याने हाजी अरफात शेख यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली हा उद्घाटन सोहळा फक्त एका कार्यालयाच्या सुरुवातीचा नव्हे तर वाहन चालकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या नव्या युगाचा प्रारंभ असल्याचे प्रतिपादन अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
KK.MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *