या एअर लाईन्सचा प्रवास होणार आता अधिक सुरक्षित
मुंबई,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारच्या ताब्यात असलेली एअर इंडीया कंपनी टाटा ग्रुपच्या ताब्यात आल्यानंतर आता अधिकाधिक सुरक्षित आणि सुसज्ज करण्यासाठी टाटा ग्रुप सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. एअर इंडिया या टाटा सन्सचा भाग असलेल्या कंपनीने जीई एयरोस्पेससोबत करार केला आहे.
४० जीईएनएक्स-१बी आणि २० जीई९एक्स इंजिन्स, तसेच बहुवार्षिक ट्रचॉईस इंजिन सर्विसेस करारासाठी फर्म ऑर्डरवर स्वाक्षरी केली आहे. २० बोईंग ७८७ आणि १० बोइंग ७७७एक्स विमानासाठी विमानसेवेच्या फर्म ऑर्डरसह समन्वयाने या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
याबाबत टाटा सन्स व एअर इंडियाचे अध्यक्ष श्री. एन. चंद्रशेखरन म्हणाले
टाटा ग्रुप व एअर इंडियामध्ये आम्हा सर्वांना जीई एरोस्पेससोबत हा सहयोग करण्याचा आनंद होत आहे, जेथे आम्ही एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमानसेवा बनवण्यासोबत सर्वात तंत्रज्ञान-प्रगत विमानसेवा बनवू.
जीईचे ज्युनिअर अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जीई एरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. लॉरेन्स कल्प म्हणाले.
आम्हाला टाटा (Tata) ग्रुप व एअर इंडियासोबतची आमची दीर्घकालीन भागीदारी सुरू ठेवण्याचा अभिमान वाटतो, असे आम्ही एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये हे इंजिन्स सादर करण्याप्रती सहयोगाने काम करण्यास खूप उत्सुक आहोत आणि ते अपवादात्मक कामगिरी देण्याची खात्री घेण्याप्रती कटिबद्ध आहोत.
एअर इंडिया चा प्रवास टाटांकडून पुन्हा टाटांकडे
- टाटा यांनी स्थापन केलेल्या एअर इंडियाने भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात अग्रणी भूमिका बजावली. १५ ऑक्टोबर १९३२ रोजीच्या पहिल्या उड्डाणापासून एअर इंडियाचे विस्तृत देशांतर्गत नेटवर्क आहे आणि यूएसए, कॅनडा, यूके, युरोप, फार-ईस्ट, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया व गल्फ येथील संपूर्ण नेटवर्कसह एक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमान कंपनी बनण्यासाठी आपली व्याप्ती पसरवली आहे. एअर इंडिया स्टार अलायन्स या सर्वात मोठ्या जागतिक विमान कंपनीची सदस्य आहे.
- सरकारी मालकीची एंटरप्राइझ म्हणून ६९ वर्षांनंतर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे जानेवारी २०२२ मध्ये टाटा ग्रुपमध्ये पुन्हा स्वागत करण्यात आले. एअर इंडियाचे सध्याचे व्यवस्थापन कंपनीला भारतीयांमध्ये जागतिक दर्जाची जागतिक विमान कंपनी म्हणून स्थापित करण्यासाठी Vihaan.AI च्या नेतृत्वाखाली पाच वर्षांच्या परिवर्तनाचा रोडमॅप चालवत आहे.
SL/KA/SL
15 Feb. 2023