पाेलीस प्रशिक्षणार्थींनी घेतली पर्यावरण संवर्धनाची शपथ
जालना, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालना येथील पाेलीस प्रशिक्षण केंद्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय वन्यजीव संस्थान भारत सरकार , सामाजिक वनीकरण विभाग आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती यांच्या वतीने पर्यावरण जनजागृती साठी पाेलीस प्रशिक्षण केंद्रात पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी १ हजार पाेलीस प्रशिक्षणार्थींना पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली, यासोबतच उपस्थितांना पर्यावरणाचे महत्त्व व पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल यासंदर्भात मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमासाठी पाेलीस प्रशिक्षण केंद्राचे उप प्राचार्य एम.एम. खान, विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे व भारतीय वन्यजीव संस्थेचे पर्यावरण तज्ञ अजय गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
ML/KA/SL
5 June 2023