‘मु.पो.बोंबिलवाडी’चा ट्रेलर रिलिज

दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा हा नवा विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मु पो बोंबिलवाडी’ या मल्टी स्टारर चित्रपटाचे ट्रेलर रिलिज निर्माते-दिग्दर्शक आणि कलाकारांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडले. प्रशांत दामले, वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत पेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर असे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. प्रशांत दामले यात ‘हिटलर’ ची भूमिका साकारत आहेत. एकंदरितच त्यांच्या पेहरावावरूनही ते लक्षात येतच. चित्रपटात तगडी स्टारकास्ट असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. त्यातच ट्रेलरमध्ये अनेक गमतीशीर प्रसंग समोर येताना दिसतात. हिटलरच्या भूमिकेतील प्रशांत दामले आणि इतरांच्या तोंडी धमाल संवाद आहेत आणि त्याची झलक या ट्रेलरमध्ये दिसत आहे. 1 जानेवारी 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात धमाल विनोदाने होणार आहे.

मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी ही मराठी मनोरंजनसृष्टीतील नावाजलेली लेखक-दिग्दर्शकाची जोडी. ‘आत्मपॅम्प्लेट’ पासून त्यांनी चित्रपटनिर्मितीक्षेत्रात देखील प्रवेश केला. त्यांच्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘वाळवी’ या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारांने गौरवण्यात आले. आता मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांचा ‘मु.पो. बोंबिलवाडी – 1942 एका बॉम्बची बोंब’ हा एक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय. मुख्य म्हणजे यातील कलाकारांना पाहूनच अंदाज येतो की प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक मेजवानी असणार आहे.

2001 साली परेश मोकाशी यांचे ‘मु. पो. बोंबिलवाडी’ हे नाटक रंगभूमीवर आले होते ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता याच नाटकाचे माध्यमांतर केलं गेलं असून मोकाशी त्याच नावाचा चित्रपट घेऊन येत आहेत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले असून निर्मितीची धुरा मधुगंधा कुलकर्णी, विवेक फिल्म्स आणि मयसभा करमणूक यांनी सांभाळली आहे.

SL/ML/SL

17 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *