TRAI ने प्रमोशनल एसएमएस बंद करण्यासाठी दिली डेडलाईन

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : TRAI ने दूरसंचार कंपन्यांना प्रमोशनल SMS बंद करण्याबाबत दिलेल्या निर्देशांना मुदतवाढ दिली आहे. यासाठी आधी 1 सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली होती. अॅक्सेस सर्व्हिस प्रोव्हायडर आणि इतर भागधारकांच्या मागणीनुसार नियामकाने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता ती आणखी 30 दिवसांसाठी वाढवण्यात आली असून 1 ऑक्टोबर 2024 ची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
TRAI ने म्हटले आहे की, “जर एखादी संस्था स्पॅम कॉल करण्यासाठी आपल्या एसआयपी/ पीआरआय लाइनचा गैरवापर करत असेल तर कंपनीचे सर्व दूरसंचार स्त्रोत दूरसंचार सेवा कंपन्यांकडून (टीएसपी) डिस्कनेक्ट केले जातील आणि संस्थेला काळ्या यादीत टाकले जाईल. “व्हाईटलिस्टमध्ये समाविष्ट नसलेल्या स्पॅमी यूआरएल / एपीके लिंक असलेल्या कोणत्याही एसएमएसला डिलिव्हरी करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
आपल्याला अनेक स्पॅम कॉल येत असतात, तसेच अनेक फसवे मेसेजही येतात. यामुळे आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते. मात्र आता आता फक्त दोनच नंबरवरुन स्पॅम कॉल येतील, असा देखील एक निर्णय घेण्यात आला आहे. अनाहून कॉल्स आणि SMS द्वारे जाहीरातींच्या भडीमारावर ट्रायनं हुकमी उपाय काढला असून अशा प्रकरणात कारवाई केली जाणार आहे.
SL/ML/SL
31 August 2024