अकलूज येथे पारंपारिक लावणी महोत्सवास सुरुवात…

 अकलूज येथे पारंपारिक लावणी महोत्सवास सुरुवात…

सोलापूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लावणी कलावंताचे माहेरघर असलेल्या अकलूज येथे पारंपारिक लावणी महोत्सवाचे काल उद्घाटन करण्यात आले. जयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अकलूजचा लावणी महोत्सव पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे.यानिमित्ताने ढोलकीच्या खणखणाट आणि घुंगराच्या गजर अकलूजमध्ये ऐकायला मिळाला.

मराठी लोककलेचा आई म्हणून लावणीकडे पाहिले जाते. ह्याच महोत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यातील सुमारें 25 लोककला पथक सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे हा लावणी महोत्सवाचे आयोजन स्वरुपाराणी मोहिते पाटील या महिलेने केले आहे. गण- गवळण आणि बैठकीच्या लावणीने महोत्सवाचे उद्घाटन झाले. या महोत्सवात मोडनिंब येथील नटरंग कला केंद्रास प्रथम सादरीकरणाचा बहुमान मिळाला. “रसिक मायबापासाठी आले मी पुन्हा…. ” या बैठकीच्या लावणीचे उपस्थित प्रेक्षकांचे मन जिंकले. हा महोत्सव पाहण्यासाठी सातारा , कोल्हापूर , अहमदनगर , नांदेड येथून प्रेक्षक अकलूज येथे दाखल झाले आहेत.Traditional planting festival begins at Akluj…

ML/KA/PGB
10 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *