पारंपारिक सुवर्णकार अडचणीत
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई सह राज्यातील पारंपरिक सुवर्णकार सद्य स्थितीत मोठ्या अडचणीत सापडले असून त्यांना आता सरकारच्या आर्थिक सहकार्याची नितांत आवश्यकता असल्याने राज्य तसेच सरकारने कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे अध्यक्ष प्रवीण जुवाटकर President Praveen Juwatkar यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात बोलताना केली.
सद्यस्थितीमध्ये सोन्यापासून दागिने निर्माण करण्याचे काम मोठमोठ्या फॅक्टरी आणि मोठ्या उद्योगांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होऊ लागलं आहे.त्यामुळे जे छोटे घरगुती सोनार होते ज्यात पेढी घालून बसलेल्या पारंपारीक सोनारांचे प्रमाण मोठे असल्याने सर्वात जास्त फटका त्यांनाच बसला आहे.
आज या सुवर्णकरांची मुख्य मागणी आहे की आमच्या व्यवसाय उत्कर्षाकरीता सोने खरेदी करिता सरकारकडून भांडवल उपलब्ध करून देण्यात यावे.
सद्यस्थितीत सरकारकडून असं कोणत्याही नियोजन नाहीये ज्याने सुवर्णकारांना जर मोठ्या प्रमाणामध्ये काम मिळालं दागिने घडविण्याचे काम मिळालं तर ते पूर्ण करण्यासाठी जे मॅनपावर लागतं आणि सामग्री लागते त्यात मुख्य असलेल्या सोने खरेदीसाठी जी आर्थिक रसद लागते ती नसल्यामुळे स्वर्ण कारागीर हवालदिल झाले आहेत.बँका किंवा आर्थिक फायनान्स कंपनीकडूनही यांना आर्थिक मदत कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जात नाही.ही खेदाची बाब असल्याचं सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण वाटकर यांचं म्हणणं आहे.
सरकारने नेमकं आता स्वर्णकारांकरिता आर्थिक मदत निधीची तरतुद करायला पाहिजे. म्हणजे त्यातून कर्ज उपलब्ध होऊन सोने घडविणे काम पूर्ण क्षमतेने करता येईल आणि मग त्यांचे काम झाल्यानंतर आम्ही घेतलेले पैसे पुन्हा सरकारला परत करू शकतो असे सचिव सुधीर सागवेकर यांचे म्हणणे आहे.
सरकारने आम्हाला भांडवल उपलब्ध करावं त्याकरिता निधी उपलब्ध करून दिल्यास स्वर्ण कामगारांसाठी किंवा जे व्यवसाय करतात त्यांना मोठी आर्थिक मदत उपलब्ध होऊन सुवर्णकारांची पिढी सुरक्षित व्यवसाय करू शकेल.शेकडो वर्षापासून हा स्वर्णालंकार घडविण्याचा व्यवसाय आमच्या पूर्वजानी स्वीकारला होता. अंगीकारला होता.कौटुंबिक पद्धतीने काम सुरू होतं ते पुढे सुरु राहण्यास मदत होईल. जे तरुण सुवर्णकार आहेत.त्यांना या क्षेत्रामध्ये काम करण्याचं आणि करिअर करण्याची मोठी संधी उपलब्ध होईल असं संजय नागवेकर म्हणाले.
शासन, प्रशासन माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा घेण्यासाठी प्रयत्न केल्यास यात बराच कालावधी लागत असल्याने बरेच सुवर्णकार हातावर पोट असल्या कारणाने याकडे पाठ फिरवतात.
मोठ मोठ्या उद्योजकांना जसे शासन माध्यमातून भांडवल उपलब्ध होत असते तसे लघु उद्योग सुवर्णकार यांना लवकरात लवकर भांडवल उपलब्ध व्हावे, पूर्वी गोल्ड कंट्रोल एक्ट होता या कायद्याने ज्यांना सरकारकडून कायदेशीर परवाना मिळत होता तेच व्यवसाय करू शकत होते.
1990 च्या दरम्यान हा कायदा रद्द होऊन मार्केट ओपन झाले त्यामुळे आर्थिक सबल असलेले ही या व्यवसायात आले.ज्यात
मोठमोठ्या कंपन्या सामील होत्या.Traditional goldsmiths in trouble
1990 ते 2022 च्या दरम्यान पारंपरिक सुवर्णकारांचे किती नुकसान झाले आहे याची शासनाने आत्तापर्यंत नोंद घ्यावी, पारंपरिक सुवर्णकार यांना भांडवल, व्यवसायामध्ये सरकारने मदत करावी, बैंक व्हॅल्यूवॅशन सोनं तारण करण्यासाठी पारंपरिक किंवा अनुभवी सुवर्णकार यांना नियुक्ती करत रोजगार निर्माण होऊ शकतो, पुर्वी जे सुवर्णकार उद्योग व्यवसाय रोजगार मध्ये सहभागी होते त्यांना प्रायव्हेट फंड (पी.एफ) किंवा विमा पॉलिसी काहीच उपलब्ध नसल्याने सुवर्णकार व्यवसायास दुर्लक्ष करत आहेत.
सध्या मशीन यंत्रणा नुसार काम सुरू असल्याने मशीन यंत्रणा प्रशिक्षण उपलब्ध झाल्यास युवा पिढीस रोजगार उपलब्ध होऊ शकेल, आर्थिक चलनातील महत्त्वाचे स्त्रोत सोनं धातू असुन सोनं उत्तम गुंतवणूक आणि दाग दागिने स्वरूपात ग्राहक वर्ग लक्ष केंद्रित करत असतो , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय देवाण घेवाण करण्यासाठी सोन्यास प्राधान्याने उपलब्धता असते.
यावेळी त्यांच्या सोबत सचिव गंगाराम सागवेकर, संजय नागवेकर आणि नंदकिशोर वळीवडेकर उपस्थित होते.
ML/KA/PGB
8 Dec .2022