व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांनी अनुभवली दोन वाघांची झुंज

 व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांनी अनुभवली दोन वाघांची झुंज

चंद्रपूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आजची सकाळ पर्यटकांसाठी मोठी मेजवानी देणारी ठरली. ताडोबातील दोन वाघांमध्ये सकाळी सकाळी भांडण झाले आणि प्रचंड मोठ्या आवाजात डरकाळ्या फोडत ते दोन्ही वाघ एकमेकांच्या अंगावर धावून गेले. बराच वेळ त्यांच्यात हे तुंबळ युद्ध सुरू होते, जे पर्यटकांनी याची देही याची डोळा अनुभवले.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघांची खाण असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. दशकापासून या व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील सर्वाधिक वाघ या व्याघ्रप्रकल्पात आहे. देशातीलच नाही तर विदेशातील पर्यटकांचा ओढा या व्याघ्रप्रकल्पाकडे आहे.अशातच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बेलारा बफर झोनमध्ये दोन वाघांची झुंज बघायला मिळाली यामुळे पर्यटकांनी मिळालेला थरार चांगलाच अनुभवला Tourists experienced the fight of two tigers in the tiger project

ML/KA/PGB
14 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *