जंजिरा जलदुर्ग बघायला २६ मे ते ३१ ऑगस्ट पर्यंत पर्यटकांना बंदी
अलिबाग, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील जंजिरा जलदुर्ग पावसाळ्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव २६ मे पासून ते ३१ ऑगस्ट पर्यंत पर्यटकांना पाहावयास बंदी ठेवण्यात येणार आहे अशी माहिती अलिबाग मुरुड पुरातन विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.
पावसाळ्यात खोरा जेटी अथवा राजापूर जेटी समुद्रकिनाऱ्यावर पाहता येईल मात्र समुद्र जाण्यास सक्त मनाई असते.
पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तसेच समुद्रातील सुरक्षिततेच्या कारणास्तव दरवर्षी जंजिरा किल्ला २५ मे पासून आतून पाहण्यास बंद केला जातो, याचे कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये समुद्राला मोठमोठ्या उधानी लाटा येतात. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पर्यटकांची खबरदारी म्हणून मुरुड जंजिरा किल्ला हा पावसात बंद ठेवण्यात येतो.
हा बंदी आदेश मेरीटाइम बोर्ड आणि पुरातन खात्याकडून प्राप्त झाले असल्याची माहिती दिली त्यामुळे आता जंजिरा किल्ला पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांना ३१ ऑगस्ट पर्यंत वाट बघावी लागणार हे नक्की.
ML/ML/SL
23 May 2024