बापरे, टोरेस कंपनीचा 3 लाख लोकांना 500 कोटींचा गंडा, कंपनीला टाळे

गुंतवणूकदारांना मोठं आमिष दाखवत गुंतवणूक करा आणि व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा असे आवाहन टोरेस लिमिटेड या चिटफंड कंपनीने केले होते. त्यांनी गुंतवणूकदारांना पाच वर्षात दुप्पट, सात वर्षात तीनपट आणि 10 वर्षामध्ये चौपट रक्कम देण्याचे येईल असे सांगितले. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळून मुंबई, उपनगरातल्या जळपास 3 लाख लोकांनी यात गुंतवणूक केली. या कंपनीचे मुख्य ऑफीस हे दादर ला आहे. सुरुवातीला कंनपीकडून काही हप्ते देण्यात आले पण गेल्या दोन आठवड्यांपासून कंपनीकडून काहीच माहिती दिली जात नसल्याने गुंतवणुकदारांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोमवार ६ जानेवारीला दादर येथील टोरेस कंपनीबाहेर गर्दी केली. तेव्हा कंपनीला टाळं लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या गोंधळानंतर पोलिस घटनास्थळी आले होते. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.