२६/११ मधील शहीदांसाठी मशाल रॅली
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेतर्फे आयोजित ‘सांगली ते मुंबई मशाल शहीद दौड’चे मशाल पेटवून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदघाटन केले. याआधी त्यांनी शहीदांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. Torch Rally for martyrs of 26/11
गेली 7 वर्ष महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेतर्फे हा उपक्रम राबविला जातो. आपल्या प्राणांची बाजी लावून दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या पोलीस अधिकार्यांचा आणि कर्मचार्यांचा यथोचित सन्मान व्हावा ही या उपक्रमामागील संकल्पना आहे. पोलिसांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांचा परिवार सुखी राहावा यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही दिले.
मुंबईवर येणार्या संकटांना पोलीस दल आपल्या अथक प्रयत्नांनी परतवून लावतात, ज्यामुळे आज प्रत्येक मुंबईकर सुरक्षित आहे. याच मुंबईकरांच्या वतीने आपल्या पोलीस दलाचे आभार मानत असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.
#Mumbai2611 #MumbaiTerrorAttack
ML/KA/PGB
26 Nov 2023