हताश शेतकऱ्यांनी उभ्या टोमॅटो प्लॉटमध्ये सोडल्या मेंढ्या.
वाशीम, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीम जिल्ह्यातील जामदरा घोटी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठया उत्पादनाच्या अपेक्षेने लाखो रुपये खर्च करून टोमॅटो ची लागवड केली. ऐन टोमॅटो काढणीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने टोमॅटोचे नुकसान झाले. उरलेल्या टोमॅटोला बाजारात मागणी नसून कवडी मोल दराने हे टोमॅटो विकल्या जात असल्याने शेतकऱ्यांचा तोडणीचा खर्च ही वसूल होत नाही त्यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यानी उभ्या टोमॅटो मध्ये मेंढ्याचा कळप सोडून दिले आहेत आणि झालेल्या नुकसानीबद्दल संताप व्यक्त केला आहे.
ML/KA/PGB 10 May 2023