टॉमेटोचे दर दुपटीने वाढले, गृहिणींना मनस्ताप

 टॉमेटोचे दर दुपटीने वाढले, गृहिणींना मनस्ताप

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जून अर्धा सरला तरी, पाऊस अजून पुरेसा पडलेला नाही. तसेच उष्णताही वाढते आहे. या तापमान बदलाचा परिणाम भाज्यांवर झाला आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांचे भाव वाढलेले आहेत. मध्यंतरी कांद्याने सामान्यांना रडवले होते. आता टॉमेटोच्या किंमती पाहून लोकांचे डोळे लाल झाले आहेत. कांदा सध्या ४० रूपयांच्या वर आहे. तर टॉमेटोची किंमत दुपटीने वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांना जरी चांगला भाव मिळत आहे. पण सामान्यांच्या खिशाला मात्र हे दर परडवणारे नाहीत. अनेक ठिकाणी ग्रॅव्हीमध्ये टॉमेटो हमखास वापरला जातो. हॉटेलमध्येही टॉमेटोविना अडू शकते. वाढलेल्या या भावाचा फटका सर्वांनाच बसणार आहे. परिणामी सगळीकडे भाव वाढीचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना कांद्यानंतर टोमॅटोही रडवणार असेच चित्र दिसत आहे

ML/ML/PGB 18 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *