#2025 पर्यंत टोल कराची कमाई होणार 1.34 लाख कोटी रुपये – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खुपच चांगली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. देशाचे टोल कराचे उत्पन्न सध्या वार्षिक 34,000 कोटी रुपये आहे. 2025 पर्यंत टोलमधून मिळणारी कमाई वार्षिक 1.34 लाख कोटी रुपये होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, आता आपण या प्रकल्पाची कमाई कशी करणार आहोत, आम्ही पैसे कसे गोळा करणार आहोत? हे माझ्यासमोरील मोठे आव्हान आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय आपण अवलंबत आहोत हे महत्वाचे आहे.
‘लीडरशिप समिट 2021’ आणि 14 व्या इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया अवॉर्ड्स मध्ये गडकरी यांनी सांगितले की चार्टर्ड अकाउंटंट आमच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहेत. सध्या एनएचएआयची आर्थिक स्थिती खरोखरच चांगल्या स्थितीत आहे. सध्याच्या टोल करामधून मिळणारे उत्पन्न वर्षाकाठी 34,000 कोटी रुपये आहे आणि 2025 पर्यंत आमचे वार्षिक उत्पन्न 1.34 लाख कोटी होईल. ते म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. वित्तीय व्यवस्थेसाठी आता देशाला विविध प्रकारचे नवे प्रयोग करण्याची गरज आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, आपली संपूर्ण यंत्रणा डिजिटल आहे. मला खात्री आहे की आपल्याला देशाच्या विकासासाठी परकीय गुंतवणूकीची गरज आहे. ते म्हणाले की, धोरणनिर्मितीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम विकसित केले जाणे आवश्यक आहे, ज्याद्वारे आपण देशासाठी अधिक थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) मिळवू शकतो. सामाजिक-आर्थिक परिवर्तन आणि दारिद्र्य निर्मूलन ही मोठी आव्हाने आहेत, परंतु नवी वित्तपुरवठा योजना, नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन कौशल्यांसह ज्ञानाचे संपत्तीमध्ये रुपांतर करणे शक्य आहे असेही गडकरी यांनी सांगितले.
Tag-Toll Tax/NHAI/Nitin Gadkari
PL/KA/PL/21 JAN 2021