निवडणूक संपल्यावर ३ जुन पासून पुन्हा टोलवाढ

 निवडणूक संपल्यावर ३ जुन पासून पुन्हा टोलवाढ

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लोकसभा मतदान संपल्यानंतर टोल वाढविला आहे. ३ जूनच्या मध्यरात्रीपासून सर्वच टोलनाक्यावर 3 ते 5 टक्के अधिक रूपयांचा टोल आकारला जाऊ लागला आहे. त्यामुळे देशभरातल्या ११०० टोलनाक्यांवर टोल वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी अचानक वाढलेल्या या टोलमुळे नागरिकाना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. एप्रिल महिन्यात टोलवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.. पण निवडणुका असल्यामुळे हा टोल वाढवण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता निवडणुका संपल्याने टोलवाढ सुरू करण्यात आली आहे. आयआरबी आणि अशोक बिल्डिकॉन या कंपन्यांना टोलवाढीमुळे मोठा लाभ होणार आहे. देशात २०१८-१९ या आर्थिक वर्षात २५२ अब्ज टोल वसुल झाला होता. तर २०२२-२३ साली ५४० अब्ज रूपये टोलवसुली झाली होती. आता टोलच्या दरात वाढ झाल्यामुळे हा आकडा चांगलाच वाढणार आहे. Toll increase again from June 3 after election

ML/ML/PGB
3 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *