आज गोड बोलण्याचा दिवस, पण सत्य बोलणं अधिक गरजेचं

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘आज गोड बोलायचा दिवस आहे , पण त्यात सत्य सुद्धा बोललं पाहिजे.. असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेच्या दावोस दौऱ्यावरून शिवसेना ऊबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज हल्लाबोल केला. यावेळी बोलताना ‘घटनाबाह्य मुख्यमंत्री दावोसच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मागचा दौरा त्यांनी केला तेंव्हा २८ तासात ४० कोटी रुपये खर्च केले होते.. आज घटनाबाह्य मुख्यमंत्री दाओस दौऱ्याला ५० लोक घेऊन जात आहेत.. आधी ५० खोके होते, आता हे ५० लोक घेऊन जाताय’.. असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी दावोस दौऱ्याच्या शिष्टमंडळ सदस्यांच्या संख्येवरून प्रश्न उपस्थित केले.
परराष्ट्र मंत्रालयाने दौऱ्याला परवानगी दिली आहे का ?
यावेळी परदेश दौऱ्याविषयी परराष्ट्र मंत्रालय आणि वित्त विभागाची परवानगी घ्यावी लागते , याची माहिती देतानाच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत . यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यासाठी १० लोकांना परवानगी दिली असल्याची माहिती आहे.. त्यात आता इतर लोकांची परवानगी या केंद्रीय मंत्रालयाने दिली आहे का? या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत उदयोग मंत्री, खासदार, माजी खासदार सुद्धा आहेत.. त्यामुळे ज्यांना गुवाहाटीत नेलं नाही , त्यांना आता दावोसला घेऊन जातायत असं वाटतंय, असा टोलाही त्यांनी लगावला..
या दौऱ्याला MSRDC चे अधिकारी, ओएसडी चालले आहेत… उपमुख्यमंत्री यांचे सुद्धा OSD आहेत.. लोकांची यादी तुम्ही पाहिलं तर जनतेला धक्का बसेल.. केंद्र सरकारचा या सगळ्यावर अंकुश आहे की नाही ? या दौऱ्यात काही दलाल सुद्धा आहेत अशी माहिती आहे.. जिथे ५-६ लोकांचं काम आहे तिथे एवढे लोक का घेऊन जाताय, बॅग उचलायला का ? असा सवाल त्यांनी केला.. तसंच या ५० लोकात कोणीही बिझनेसमेन नाही. त्यामुळे हा खर्च जरी स्वतः ते करणार असले तरी MEA ला हे माहिती आहे का? आणि तुम्ही इतक्या लोकांना परवानगी दिली आहे का ? माझं आव्हान आहे की भाजपने रेस्कोर्स आणि दाओस दौऱ्यावर त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी असं आदित्य ठाकरे म्हणाले.
ML/KA/SL
15 Jan. 2024