तुळजापूर इथे आज घटस्थापना
धाराशिव, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात आज घटस्थापनेने होत आहे. तत्पूर्वी आज पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. या नवरात्र महोत्सवात विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार असून यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम श्री तुळजाभवानी मंदिरात होणार आहेत . दुपारी बारा वाजता तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिव चे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना होणार आहे.
ML/ML/SL
3 Oct. 2024