तंबाखू सोडण्यासाठी आता महाराष्ट्रात शिक्षक होणार ब्रँड ॲम्बेसेडर
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात संपूर्ण लोकसंख्येच्या २७ टक्के लोकसंख्या तंबाखू सेवनाने होणाऱ्या समस्यांनी त्रस्त असून , भारतात तंबाखूशी संबंधित मृत्यूचा दर हा दररोज ३७०० व्यक्ती इतका आहे. या भयावह स्थितीचा सामना करण्यासाठी आता महाराष्ट्रातील शिक्षकांना तंबाखू सोडण्यासाठीचा ब्रँड ॲम्बेसेडर करत ” तंबाखू मुक्त समाज ” या जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात करणार असल्याची माहिती प्रेस क्लब येथे गुरुवारी हिलीस या आंतरराष्ट्रीय तंबाखू मुक्त समाज संस्थेचे संचालक डॉ.प्रकाश गुप्ता यांनी दिली.
या जनजागृती कार्यक्रम अंतर्गत शाळांमध्ये तंबाखू नियंत्रणाचे प्रयत्न वाढवण्यासाठी शिक्षकांनाच महत्त्वपूर्ण प्रभावशाली व्यक्ति म्हणून सादर करण्यात येणार आहे. बिहार मध्ये या अगोदरच तंबाखू मुक्त समाज कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. आता महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे असे डॉ.मंगेश पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.
तंबाखूच्या दुष्परिणामांची गडद छाया महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असून २० टक्के जनतेला तंबाखू सेवनामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुंबई बरोबरच पुण्यातील निसर्गरम्य परिसरात सुध्दा तंबाखू मुळे रोज होणाऱ्या मृत्यूची संख्या खूप मोठी आहे.असे डॉ.मंगेश पेडणेकर यांनी सांगितले.
तंबाखूमुळे केवळ मृत्यूच होत नाही तर श्वसनाशी संबंधित समस्या, हृदयविकार आणि विविध प्रकारच्या कॅन्सर सारख्या आरोग्य समस्याही निर्माण होताना दिसत आहेत . सार्वजनिक आरोग्यावर होणारा हा घातक परिणाम पाहून नाविन्यपूर्ण उपायांची गरज असून तंबाखू मुक्त समाज कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. असे डॉ. पेडणेकर यांनी यावेळी सांगितले. To quit tobacco, teachers will now become brand ambassadors in Maharashtra
ML/KA/PGB
24 Jan 2024