आत्मनिर्भर होण्यासाठी ज्ञानाप्रति समर्पित होणे आवश्यक

 आत्मनिर्भर होण्यासाठी ज्ञानाप्रति समर्पित होणे आवश्यक

नागपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर आपण आत्मनिर्भर बनू पाहतो आहे आणि या विश्वाची नंबर एक अर्थव्यवस्था निर्माण करू पाहतो आहे आमच्या पंतप्रधानांनी 5 ट्रेलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याची गोष्ट केली आहे ते जर करू पाहतो आहे तर आम्हाला ज्ञाना प्रति समर्पित होणे आवश्यक आहे असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे व्यक्त केले.To be self-reliant one must be devoted to knowledge

केंद्रीय आयुष् मंत्रालयाच्या सहकार्याने तीन दिवसीय आयुर्वेद पर्व आणि आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते, आयुर्वेद व्यासपीठाच्या रजत जयंती वर्ष समारोप समारंभा प्रसंगी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले ज्ञानावर कुणाची मक्तेदारी नाही . ज्ञान हे कुठून मिळेल हे देखील निश्चित नाही ,आपले सहकारी, वरिष्ठ त्यांच्याकडून देखील मार्गदर्शन मिळू शकतो जे जे ज्ञान आहे , परफेक्शन आहे त्याच्यामुळे निदान केल्यानंतर लोकांचे समाधान होत असेल ज्यामुळे जीवन सुसह्य होत असेल त्या प्रयोगाचे अध्ययन करणे त्या आधारावर त्याला स्वीकार करणे असेही ते म्हणाले.

आयुर्वेद मध्ये चांगले चांगले परिणाम मिळत आहेत. संशोधन खूप महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले. विश्वात आमचा योग विज्ञान ,आयुर्वेद, आमची चिकित्सा पद्धती, आमचा पंचकर्म याचे पूर्ण विश्वात आकर्षण आहे असेही ते म्हणाले. या वेळेला युवा अध्यापक पुरस्कार, तसेच घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे पुरस्कार देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.To be self-reliant one must be devoted to knowledge

ML/KA/PGB
13 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *