नगरसेवक तेजिंदर सिंग तीवाना यांची स्थायी समिती सदस्य पदी निवड
मुंबई, दि १६
भारतीय जनता पार्टी सर्व स्तरांवर युवांची भूमिका सुनिश्चित करत त्यांना नेतृत्व व कार्य करण्याच्या संधी देत आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्येही पक्षाने युवा चेहऱ्यांना उमेदवारी देत संघटनेची युवा दृष्टी अधिक बळकट केली आहे.
याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांची “स्थायी समिती सदस्य” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सक्रिय जनसंपर्क, प्रशासकीय अनुभव आणि विकासकामांप्रती असलेल्या सातत्यपूर्ण बांधिलकीची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थायी समिती ही महानगरपालिकेतील अत्यंत महत्त्वाची निर्णयप्रक्रियेसंबंधी समिती असून ती आर्थिक प्रस्ताव, विकास योजना तसेच महत्त्वाच्या धोरणात्मक विषयांवर निर्णय घेते. तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नियुक्तीमुळे नगर प्रशासनाला युवा ऊर्जा, पारदर्शकता आणि गतिमान कार्यपद्धतीचा लाभ होईल.
यावेळी तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, “मुंबईतील प्रत्येक नागरिकाचा हितसंबंध आमच्यासाठी सर्वोच्च आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जलद विकास हीच आमची ओळख राहील. स्थायी समितीमध्ये कार्य करताना युवाशक्तीच्या बळावर सक्षम पायाभूत सुविधा, स्वच्छ शहर, सुरक्षित पर्यावरण आणि उत्कृष्ट नागरी सुविधा असलेली नवी व विकसित मुंबई घडविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, जी ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पपूर्तीत महत्त्वाची भूमिका बजावेल.”
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्ष नेतृत्व आणि नागरिकांचे आभार मानत सांगितले की, ही जबाबदारी त्यांच्या दृष्टीने सन्मानासोबतच एक महत्त्वपूर्ण दायित्व असून ती पूर्ण निष्ठा, समर्पण आणि प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याची माहिती नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी दिली.KK/ML/MS