तीव्र ऊन, चारा आणि पाणी टंचाई यामुळे दूध उत्पादनात घट…

सांगली, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात तीव्र ऊन, चारा आणि पाणीटंचाई यामुळे दुधाच्या दैनंदिन उत्पादनात एक लाख लिटरची घट निर्माण झाली आहे. सहकारी आणि खाजगी दूध संस्थामार्फत 18 लाख लिटर दुधाचे दररोज संकलन केले जाते. पण गेल्या काही दिवसात दैनंदिन दूध उत्पादनात एक लाख लिटरची कमतरता निर्माण झाली आहे. या भागात वारणा, कृष्णा तसेच चितळे समूहामार्फत मोठ्या प्रमाणात दूध संकलन केले जाते. यापैकी 60 टक्के दूध प्रक्रिया करून विक्रीसाठी मुंबई आणि पुणे येथे पाठवले जाते , तर 20 टक्के दूध स्थानिक ग्राहकांना पिशवी बंद पद्धतीने विकले जाते. उर्वरित दुधाची निर्यात तसेच अन्य प्रक्रिया करून विकण्यात येते.
जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात हिरवा चारा तथा अन्य कारणामुळे दूध उत्पादनात दहा टक्के वाढ होते पण यावेळी मात्र चारा आणि पाणीटंचाई या कारणामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. एकूण दूध उत्पादनापैकी 60% गाईचे तर 40 टक्के दूध म्हशीचे असते. सांगली जिल्ह्यात 17 दुध संघ, 12 खाजगी दूध संस्था दूध संकलनाचे काम करतात.
ML/ML/PGB 12 april 2025