ऑपरेशन सिंदूरच्या विजयानिमित्त सिंधुदुर्गात तिरंगा यात्रा

ऑपरेशन सिंदूर नंतर मिळालेल्या विजयाचा जयघोष आणि सैन्याला अभिवादन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात पडेल कॅन्टीन ते श्री देव रामेश्वर मंदिर येथे देशप्रेमी ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांनी सहभागी होऊन देशातील शूर, पराक्रमी सैनिकांना मानवंदना अर्पित केली. याप्रसंगी पंचक्रोशीतील देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी है. भारत माता की जय. वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.