Google Maps मधून Timeline डेटा गायब

मुंबई,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लांबवरचा प्रवास असो की गल्लीबोळात फिरायचे असो Google Maps हाच आता आपला दिशादर्शक सोबती झाला आहे. हे App नुसता रस्ता दाखवत नाही तर तुम्ही कुठे कुठे प्रवास केलात याची History देखील सेव करते. Google Maps युजर्सने नुकताच आपला Timeline डेटा गायब झाल्याची तक्रार केली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे घडल्याची कबुली Google ने दिली आहे. ज्या युजर्सनी एन्क्रिप्टेड बॅकअप घेतले होते ते त्यांचा डेटा रिकव्हर करू शकतात, तर बॅकअप नसलेले युजर्स डेटा रिकव्हर करू शकत नाहीत.
Android Authority ने पाहिलेल्या Reddit पोस्टमध्ये, काही युजर्सनी निदर्शनास आणून दिले की Google ने त्यांना डेटा रिकव्हर कसा करावा याबद्दल सूचनांसह एक ईमेल पाठविला होता, परंतु हे फीचर्स केवळ त्यांनाच उपलब्ध होते ज्यांच्याकडे अॅपचा क्लाउड बॅकअप चालू होता.
असा घ्या Google Maps Backup
Google Maps अॅप (iOS किंवा Android) मधील युजर्स चिन्हावर टॅप करा, नंतर “Your Timeline” वर जा. तेथे क्लाऊड आयकॉन दिसेल. त्यात बाणासह आयकॉन असेल तर बॅकअप चालू असतो आणि आयकॉन रेषांपासून कापला गेला तर बॅकअप बंद असतो. या आयकॉनवर टॅप करून आपण आपली बॅकअप सेटिंग्ज बदलू शकता.
SL/ML/SL
25 March 2025