सीमावादावर भूमिका घेण्याची वेळ आली आहे

 सीमावादावर भूमिका घेण्याची वेळ आली आहे

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सीमा भागात गेले काही दिवस सुरू असलेले प्रकार आणि आज घडलेल्या घटना यामुळे तिथली स्थिती चिंताजनक आहे, याच कारणाने आता सीमा वादावर भूमिका घेण्याची वेळ आली आहे, मात्र येत्या ४८ तासात हे थांबलं नाही तर आपल्यालाही बेळगावात जावं लागेल असा इशारा खा शरद पवार यांनी दिला आहे.Time to take a stand on borderism

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सातत्याने वादग्रस्त विधाने केली त्याने वातावरण बिघडले आहे, आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून समन्वय करण्याचा प्रयत्न केला ही चांगली बाब आहे मात्र आज महा परिनिर्वाण दिवशी आपल्या वाहनांवर हल्ले होत आहेत हे चिंताजनक आहे असे पवार म्हणाले.Pawar said that this is worrying.

केंद्राला यावर बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, उद्यापासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे, त्यात हा विषय उपस्थित केला जाईल मात्र न्यायालयात याचिका दाखल असताना कायदा हातात घेण्याची कर्नाटक मधील लोकांची भूमिका मान्य करता येणार नाही. हा प्रश्न आताच कसा उफाळून आला, त्यांची चिथावणीखोर वक्तव्य असताना दुर्दैवाने आपले राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे असा आरोपही पवारांनी केला.

महाराष्ट्राचा संयम एका मर्यादेपर्यंतच ठीक आहे, मात्र कर्नाटकातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे होत नाही ना हे तपासून पाहावे लागेल.येत्या चोवीस तासांत तिथला हिंसाचार थांबणे गरजेचे अन्यथा अनुचित प्रकार घडल्यास बोम्मई जबाबदार राहतील असे शरद पवार म्हणाले.

ML/KA/PGB
6 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *