१६ सप्टेंबरला टिळक भवनमध्ये काँग्रेसचा रोजगार मेळावा.

मुंबई, दि. १२ —
राज्यात बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढलेली असून शिक्षण असूनही रोजगार मिळत नाही अशी परिस्थिती आहे. सरकार नोकर भरती करत नसल्याने लाखो पात्र मुले-मुली रोजगारापासून वंचित आहेत असा आरोप करत तरुणांच्या हाताला काम मिळावे या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून मंगळवार, दिनांक १६ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे आयोजित या रोजगार मेळाव्यात आयटी, बँकिंग, रिटेल, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रांतील ४० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या माध्यमातून तरुणांना शेकडो नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातील इयत्ता ८ वी पासपासून उच्च शिक्षित गरीब व मध्यम वर्गीय तरुणांसाठी ही विशेष संधी आहे. बेरोजगार तरुणांनी https://forms.gle/1Y7mScKgSAc9tY1E8 या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी व या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आले आहे.ML/ML/MS