अमरावतीत तिज महोत्सवाची धूम, बंजारा महिलांचा जल्लोष…
 
					
    अमरावती, दि.२६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कधीकाळी डोंगरदरीत राहणारा बंजारा समाज आज तांडा,वाडी, वस्ती, शहरात जरी राहत असेल तरी बंजारा संस्कृती जपतोय त्याचा एक उदाहरण म्हणजे बंजारा तिज महोत्सव. या तीज महोत्सवाची धूम सध्या अमरावतीत पाहायला मिळत आहे.अमरावतीच्या मनोहर मांगल्यम सभागृहात तिज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बंजारा महिलांनी पारंपारिक वेशभूषा करून नृत्य केलं,यावेळी मोठ्या संख्येने समाज एकवटला होता.
तिज महोत्सवातून बंजारा समाज आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा प्रयत्न करतोय..बंजारा समाजाच्या तिज महोत्सवामध्ये वधू-वर परिचय मेळावा,उपवर मुलांची आणि मुलींची माहिती घेऊन त्यांच्याशी नाते संबंध जुळतात, नंतर सोयरिक होऊन त्यांचा विवाह संपन्न होतो,असा या तीज महोत्सवाचा कार्यक्रम असल्याचे अमरावतीचे बंजारा तांड्याचे नायक प्रल्हाद चव्हाण यांनी सांगितले.
ML/ML/SL
26 August 2024
 
                             
                                     
                                    