शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी दादरमध्ये कडक बंदोबस्त
मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क): शनिवारी दादर येथील शिवाजी पार्क मध्ये शिवसेनेचा (उबाठा) दसरा मेळावा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी येणाऱ्या शिवसैनिकांसाठी या भागात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तर येथील आजूबाजूच्या काही भागात वाहन पार्किंग तळ उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे नुकत्याच मुंबईत घातपात घडवण्याच्या आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
शिवाजी पार्क मैदानाच्या आजूबाजूला तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्तासाठी येथे ३ पोलीस उपायुक्त, ५ सहाय्यक उपायुक्त, ३० पोलीस अधिकारी तसेच ३०० अंमलदार यांच्यासह महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आहेत. तसेच इतर सुरक्षा यंत्रणांचे जवान आणि तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कोणत्याही संशयास्पद हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याची माहिती शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास दातीर यांनी दिली.
वाहतूक बदल –
उद्या दादर मध्ये शिवसेनेच्या होणाऱ्या दसरा मेळावा आणि दुर्गादेवी विसर्जन हे दोन प्रमुख कार्यक्रम होणार असल्याने या भागात प्रचंड गर्दी होणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या भागात व्हातुक बदल करून काही निर्बंध जारी केले आहेत. तर या दसरा मेळाव्यात दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्क येथे मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे परिणामी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यत्यय येणार आहे. शिवाजी पार्क परिसरात दसऱ्याच्या दिवशी सकाळी ९ ते मध्यरात्रीपर्यंत वाहतूक पोलिसांनी निर्बंध लागू केले आहेत. त्यात दसरा मेळाव्याकरीता नागरीकांना घेवून येणाऱ्या वाहनांची पार्किग व्यवस्था अनेक ठिकाणी करण्यात आलेली आहे.
पश्चिम उपनगरे-
पश्चिम उपनगरे येथून पश्चिम द्रुतगती मार्गाने मेळाव्यासाठी लोकांना घेवून येणारे वाहन चालक त्यांची वाहने बसेससाठी पार्किग म्हणून सेनापती बापट मार्ग- सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम, मुंबईकामगार मैदान- सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड येथे तर कारसाठी पार्किगसाठी इंडिया बुल- १ सेटर- इंडिया बुल फायनान्स सेंटर सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड तसेच कोहिनूर स्क्वेअर- कोहिनुर स्क्वेअर, कोहिनुर मिल कंम्पऊंड दादर येथे व्यवस्था केली आहे.
पूर्व उपनगरे-
ठाणे, नवी मुंबई तसेच पूर्व उपनगरातील पुर्व द्रुतगती मार्गाने मेळाव्यासाठी लोकांना घेवून येणारे वाहन चालक त्यांची वाहन पार्किंग व्यवस्था ही बसेससाठी पार्किंग म्हणून पाच गार्डन माटुंगा- लेडी जहांगीर रोड, माटुंगा पूर्व , नाथालाल पारेख मार्ग- नाथालाल पारेख मार्ग, माटुंगा पूर्व, एडनवाला रोड- एडनवाला रोड, माटुंगा पूर्व तसेच आर. ए. के. रोड- आर. ए. के. चार रस्ता वडाळा येथे केली आहे. तर मुंबई शहरे व दक्षिण मुंबई येथेही वीर सावरकर रोड मार्गे दक्षिण मुंबई कडून मेळाव्यासाठी लोकांना घेवून येणारे वाहन चालक त्यांची वाहने रविंद्र नाटय मंदिर येथे लोकांना उतरवून खालील ठिकाणी पार्क करण्यात येतील.
बॉक्स – बस गाड्या पार्किग –
आप्पासाहेब मराठे मार्ग- आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी तर कारसाठी पार्किगइंडिया बुल 1 सेंटर- ज्युपिटर मिल कंम्पा. सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन येथे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले .
ML/ML/SL
11 Oct. 2024