‘वाघनखे खरी असल्याची खात्री नाही’ सातार्‍याच्या म्युझियमकडून स्पष्ट सूचना

 ‘वाघनखे खरी असल्याची खात्री नाही’ सातार्‍याच्या म्युझियमकडून स्पष्ट सूचना

सातारा, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून काही दिवसांसाठी भारतात आणण्यात आलेली ही वाघनखे शिवाजी महाराजांनी विजापूरचा सुलतान अफजल खान याचा कोथळा काढण्यासाठी वापरलेली वाघनखे आहेत, असा दावा सुरुवातीला राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत होता. मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथित वाघनखांवरून आता राज्य सरकारने सपशेल माघार घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे ती हीच आहेत किंवा नाही याची खात्री नाही, असा डिस्क्लेमर किंवा सूचना आता सातार्‍याच्या म्युझियममध्ये लावण्यात आली आहे.

वास्तविक वाघनखे अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेलीच आहेत किंवा नाही याची खात्री देता येत नाही, असे लंडनच्या म्युझियमने आधीच स्पष्ट केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील काही इतिहास संशोधकांनीही वाघनखे खरी नाहीत, असा दावा केला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला. पण तरीही सरकार आपल्या भूमिकेवर ठाम होते. पण आता सरकारने कोलांटउडी मारत भूमिका बदलली आहे. सातार्‍याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज म्युझियममध्ये जिथे ही वाघनखे सध्या प्रदर्शनात ठेवली आहेत तिथे म्युझियमच्या व्यवस्थापनाने ‘वाघनखे खरी असल्याची खात्री देता येत नाही’, अशी सूचना ठळक अक्षरात लावली आहे.

लंडनच्या म्युझियममध्ये असलेल्या नोंदीनुसार ही जी वाघनखे आहेत ती छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती प्रतापसिंह यांनी सन 1818 ते 1823 या कालावधीत जेम्स ग्रँट डफ या तत्कालीन ब्रिटिश अधिकार्‍याला भेट दिली होती. पुढे डफ यांच्या वारसांनी वाघनखे ऐतिहासिक असल्याने म्युझियमच्या स्वाधीन केली.

SL/ML/SL

27 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *