रेल्वे अपघातात वाघिणीचा मृत्यू
चंद्रपूर दि १ :– चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील चणाखा-विहीरगाव रेल्वे मार्गावर पहाटे सुमारे ३:३० वाजता मालगाडीच्या धडकेत एका वाघीणीचा मृत्यू झाला. राजुरा वनपरिक्षेत्रातील चणाखा कक्ष क्र. १६० जवळील ट्रॅकवर गस्त घालताना वनरक्षकांना मृत वाघीण आढळली. वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोरदार धडकेत वाघीणी जागीच ठार झाली.
चणाखा-विहीरगाव परिसर जंगलाशी संलग्न असून येथे वाघ, बिबट्या, हरिणे यांसारख्या वन्य प्राण्यांचा सतत वावर असतो. वनविभागाने मृतदेह पंचनामा करून ठराविक तपासणीनंतर चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर चंद्रपूर येथे पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. अशा रेल्वे अपघातांचे प्रकरण येथे सातत्याने घडत असल्याचे अधिकारी सांगत आहेत.ML/ML/MS