नरभक्षक वाघ अखेर जेरबंद
चंद्रपूर दि ११ : — चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर परिसरात दोन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला अखेर वनविभागाच्या पथकाने यशस्वीपणे जेरबंद केले. गेल्या काही दिवसांपासून या वाघाचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून विशेष पथके तैनात करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी शिवरा आणि शंकरपूर येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.या घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त ग्रामस्थांनी वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी करत आंदोलनही केले होते. अखेर वनविभागाच्या अथक प्रयत्नांनंतर वाघाला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले आहे.ML/ML/MS