रेल्वेच्या धडकेने पट्टेरी वाघाचा मृत्यू….

चंद्रपूर दि १४ :– चंद्रपूर जिल्ह्यात चांदा फोर्ट- गोंदिया रेल्वेमार्गावर आणखी एका पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला आहे, भरधाव रेल्वेच्या धडकेने सिंदेवाही रेल्वे स्थानकाजवळ या वाघाचे आढळले.
हिरव्यागार जंगलातून जाणा-या या रेल्वे मार्गावर वारंवार असे वन्यजीवांचे मृत्यू होत आहेत. जय वाघाचा वंश असलेला बिट्टू याचा ताज्या घटनेत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चांदा फोर्ट- गोंदिया रेल्वेमार्गावर भरधाव रेल्वेच्या धडकेने सिंदेवाही रेल्वे स्थानकाजवळ बिट्टू नामक वाघाचे शव आढळले. हिरव्यागार जंगलातून जाणा-या या रेल्वे मार्गावर वारंवार वन्यजीव मृत्यू ओढवत आहेत. बिट्टू हा जय वाघाचा वंश आहे. या रेल्वेमार्गावर होणाऱ्या वन्यजीव मृत्यूची नागपूर उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. यावर उपाययोजना न केल्यास रेल्वेची गती निर्धारित करण्याचा आदेश देण्याचा इशारा न्यायालयाने दिला आहे.ML/ML/MS