दोन वाघांच्या झुंजीत एक ठार , दुसरा गंभीर जखमी

चंद्रपूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू तर एक वाघ गंभीर जखमी झाला आहे. चिमूर प्रादेशिक वन विभाग खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या वहानगाव ही झुंज झाली होती .
या दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला तर एक वाघ गंभीर रित्या जखमी असून त्याच ठिकाणी तोही बसून आहे अशी माहिती समोर आली आहे. ही घटना वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतात घडली असून वाघाला बघण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केलेली आहे तसेच हा वाघ नर असून जवळपास अडीच वर्षाचा असल्याचे सांगितले जात आहे.
ML/KA/PGB 15 Nov 2023