महाकुंभमध्ये होणार तीन विश्वविक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सची टीम प्रयागराजमध्ये दाखल

 महाकुंभमध्ये होणार तीन विश्वविक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सची टीम प्रयागराजमध्ये दाखल

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे, महाकुंभसाठी जगभरातील लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. भाविकांच्या संख्येचा जगातील सर्वात मोठा विक्रम येथे रचला आहे. आता आणखी तीन नवीन विश्वविक्रम होणार आहेत. आज १४ फेब्रुवारीला १५ हजार स्वच्छता कर्मचारी एकाच वेळी संगम परिसरातील गंगा नदीच्या काठाचा १० किमी लांबीचा परिसर स्वच्छ करणार आहेत. तर १५ फेब्रुवारीला प्रयागराजमधील संगमातील पाण्याचा प्रवाह ३०० पेक्षा जास्त लोकं स्वच्छ करतील. तर १६ फेब्रुवारीला त्रिवेणी मार्गावरच्या परेड ग्राऊंडवर एकाच वेळी हजार इ रिक्षा चालवल्या जातील. १७ फेब्रुवारीला १० हजार लोकांच्या हाताचे ठसे उमटविण्याचा रेकॉर्ड केला जाणार आहे. या विश्वविक्रमांची नोंद ठेवण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सची टीम प्रयागराजमध्ये दाखल झाली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *