पोलीस – नक्षल चकमकीत तीन नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा हस्तगत ….

 पोलीस – नक्षल चकमकीत तीन नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा हस्तगत ….

गडचिरोली दि १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेरमिली नक्षल दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कटरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात सध्या सुरू असलेल्या TCOC कालावधीत विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची विश्वसनीय सूत्राकडून गडचिरोली पोलीस दलास प्राप्त होताच सी 60 च्या दोन तुकड्याच्या सहाय्याने जंगल परिसरात शोध मोहीम राबवीत असताना आधीच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी c60 पोलीस जवानावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यालाही जशास C 60 पोलीस जवानाने जोरदार प्रत्युत्तर दिले.

पोलिसाचा वाढता दबाव पाहून जंगलाचा आसरा घेत नक्षल पसार झाले. C 60 पोलीस जवान चकमकीनंतर घटना स्थळी सर्चिंग ऑपरेशन तीव्र करून जंगल परिसरात शोध घेतले असता 1 पुरुष आणि 2 महिला नक्षलवादी यांचे मृतदेह सापडले असून नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा प्राप्त झाला आहे. यामध्ये तीन स्वयंचलित शस्त्रे – 1 एके 47, 1 कार्बाइन आणि 1 इन्सास, नक्षल साहित्य आणि सामानही जप्त करण्यात आले आहे. सदर हे मृतदेह प्रामुख्याने पेरिमिली नक्षल दलमचे प्रभारी कमांडर डीव्हीसीएम वासू यांचे आहेत. इतर सदस्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पोलीस विभाग सतर्क झालेला आहे..

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *