फोर्ब्जच्या २० आशियाई महिला उद्योजकांच्या यादीत तीन भारतीय महिला
मुंबई,दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या २० आशियायी महिला उद्योजकांच्या यादीत स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (सेल) सोमा मंडल, एमक्युअर फार्माच्या व्यवस्थापकीय संचालक नमिता थापर आणि होनासा कंझ्युमरच्या सहसंस्थापक गजल अलघ यांचा समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्सच्या नोव्हेंबर महिन्याच्या ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.कोरोनाच्या अनिश्चिततेच्या काळात व्यवसाय वृद्धी आणि विस्तार करणाऱ्या महिला उद्योजकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
फोर्ब्सच्या यादीत झळकलेल्या भारतीय उद्योजिकांबद्दल अधिक माहिती
1.सोमा मंडल : यांनी जानेवारी २०२१ मध्ये सेलच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिला महिला आहेत.
2.नमिता थापर : एमक्युअर फार्मा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या थापर यांची संपत्ती ६०० कोटी एवढी आहे. तसेच इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेडच्या संस्थापक-सीईओसुद्धा आहेत.
3.गजल अलघ : यांनी सन २०१६ मध्ये पती वरुण अलघ यांच्यासोबत होनासा कंझ्युमर कंपनीची स्थापना केली होती. विषारी पदार्थ मुक्त हा ब्रँड असल्याने सर्वाधिक वेगाने प्रगती करणारा एफएमसीजी ब्रँड समजला जातो.
Three Indian women in Forbes list of 20 Asian women entrepreneurs
SL/KA/SL
9 Nov. 2022