कुंभमेळ्यात नोंदविले गेले ३ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १४४ वर्षांनंतरची येणारा प्रयागराज येथील ४५ दिवस चाललेल्या महाकुंभमेळ्याची शिवरात्रीच्या दिवशी सांगता झाला. महाकुंभमेळयात गर्दीच्या उच्चांकासह एकूण तीन विश्वविक्रमांची गिनीज बुकात नोंद झाली आहे. सलग ४५ दिवस चाललेल्या हा भक्तीचा महासोहळा जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम ठरला आहे. जगभरातील ७० देशांमधून भाविकांनी महाकुंभमेळ्याला हजेरी लावली. ४५ दिवसांच्या या सोहळ्यात सुमारे ६६ कोटी भाविकांची उपस्थिती लाभली.
त्याचबरोबर १० हजार १०२ लोकांनी स्वतःच्या हातांनी रंगविलेल्या चित्राने सर्वाधिक लांब चित्र असा विश्वविक्रम केला.तिसरा विक्रम गंगा नदीच्या सफाईचा आहे. यामध्ये ३६० भाविकांनी चार ठिकाणी गंगेची सफाई केली.म्हणजे उच्चांकी गर्दी, सर्वाधिक लांबीचे चित्र आणि गंगासफाई असे तीन विश्वविक्रम महाकुंभमध्ये नोंदले गेले आहेत.
SL/ML/SL
28 Feb. 2025