चिपळूणमध्ये झाला तीन दिवसीय नमन महोत्सव…

रत्नागिरी दि २८:– सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा तसेच लोकसंस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे, नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची आणि परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून तथा सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२५ चा कोकणातील पारंपरीक लोककलेचा तीन दिवसीय नमन महोत्सव नागरिकांच्या उदंड प्रतिसादात चिपळूण येथे संपन्न झाला.
यंदाच्या महोत्सवात जिल्ह्यातील १० नमन मंडळांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. शासनाने लोककला महोत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठामुळे कलाकारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यामुळे त्यांनी शासनाचे आभार देखील व्यक्त केले. दरम्यान राज्यस्तरावर देखील अश्याच प्रकारे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी कलाकारांमधून करण्यात आली.