दृष्टीहिनांचे तीन दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण

 दृष्टीहिनांचे तीन दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण

पुणे दि ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन इंडिया नाशिक आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दृष्टीहीन बांधवांच्या ब्रेल ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे उद्घाटन आळंदी येथील भक्तनिवास सभागृहात संपन्न झाले.

उद्घाटन समारंभामध्ये ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष अरुण भारस्कर, आळंदी नगरपालिका मुख्याधिकारी कैलास केंद्रे, संस्थांचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर तळेगाव येथील समाजसेवक लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी आणि मान्यवरांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गौरवलेले दृष्टीहीन ह भ प गणपती महाराज जगताप मार्गदर्शन करताना म्हणाले की ज्ञानेश्वरीची अनेक भाषात भाषांतरे झाली मग दृष्टिहीन बांधवांनाही ज्ञानेश्वरी वाचता यावी या उद्देशाने ब्रेल भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिण्यात आली. ज्ञानेश्वरी हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा ग्रंथ आहे दृष्टी हिनाच्या जीवनातही ब्रेल ज्ञानेश्वरीचा माध्यमातून प्रकाश निर्माण झाला आहे.

उद्घाटन समारंभात बोलताना आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले की ज्ञानेश्वरी मधून तरुण पिढी सह सर्वांना जीवनात समाधानी राहण्याचा जीवन विशेष दृष्टिकोन मिळते. नगरपालिका मुख्याधिकारी केंद्रे यांनी यावेळी आळंदी परिसरातील दृष्टीहीन बांधवांसाठी नगरपालिका पातळीवर विविध योजनांचा लाभ देण्याचा मनोदय व्यक्त केला. या कार्यक्रमात तळेगाव दाभाडे येथील समाजसेवक लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनीही ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञानावर आधारित आपले विचार व्यक्त केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात पाच दृष्टीहिनांना ब्रेल ज्ञानेश्वरी चे वाटप करण्यात आले.

ज्ञानेश्वरी पारायण याचे नेतृत्व व्यासपीठावरून ह भ प अमोल महाराज घाईजे, दृष्टीहीन ह भ प गणपतराव जगताप महाराज यांनी केले. यावेळी ज्ञानेश्वरीच्या नवव्या, बाराव्या, पंधराव्या आणि अठराव्या अध्यायाचे पारायण करण्यात आले. या तीन दिवसीय ब्रेल ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये संध्याकाळी दिव्यांग कीर्तनकार अमोल महाराज बागडे, कीर्तनकार अमोल भाईजी यांचा कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

या ज्ञानेश्वरी पारायणासाठी महाराष्ट्राच्या सर्व भागातून दृष्टिहीन बांधव मोठ्या संख्येने आळंदी मध्ये आले आहेत. त्यांच्या करिता आळंदी देवस्थान आणि परिसरातील सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणावर सर्वतोपरी सहाय्य उपलब्ध करून दिले आहे अशी माहिती अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी दिली.

ML/KA/SL

5 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *