कारमध्ये गुदमरुन तीन बालकांचा मृत्यू

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टेका नाका परीसरातून शनिवारी सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी खेळताना अचानक बेपत्ता झाली. त्या तीनही चिमुकल्यांचे मृतदेह काल आढळले. मुलांचा वाहनात गुदमरल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलांमध्ये दोन भावंडे तर एक त्यांची मैत्रिण आहे. शनिवारी सायंकाळी सहा वर्षे वयोगटातील तीनही मुले टेका नाकाजवळील फारुख मैदानावर खेळत होते. रात्र झाली तरीही मुले घरी न परतल्याने पालकांनी शोधाशोध केली. पालकांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी लगेच त्या भागातील उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही कँमेऱ्याचे तपासणे सुरु केले आहे. मुले बेपत्ता होऊन २४ तासांचा अवधी उलटून गेल्यानंतरही पोलिसांना मुलांना शोधता आले नाही. पोलिसांनी अपहृत तीनही मुलांचे छायाचित्र आणि माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत नागरिकांना आवाहन केले होते.
मुलांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी पुन्हा फारुखनगरात शोधणे सुरु केले. तीनही मुलांचे वय लक्षात घेता ते जास्त दूर गेले नसल्याचे पोलिसांना खात्री होती. त्यात रात्री आठ वाजता एका वाहनात तीनही मुले बेशुद्धावस्थेत मिळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.Three children died of suffocation in a car
ML/KA/PGB
19 Jun 2023